भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या हा कायमच चर्चेत असतो. हार्दिकने अभिनेत्री नाताशा स्टेनकोविकशी लग्न केले. पण आता त्यांच्या खासगी आयुष्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. नताशा आणि हार्दिकचा घटस्फोट झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच नताशा सायबेरियन मॉडल अलेक्जेंडर एलेक्स इलिकसोबत दिसली. एलेक्स हा अभिनेत्री दिशा पटाणीला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.