मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: मराठी भाषेची गोडी सांगणाऱ्या ‘मधुरव’चा गौरव; राज्यपालांकडून पाच लाखांचे बक्षीस जाहीर!

Video: मराठी भाषेची गोडी सांगणाऱ्या ‘मधुरव’चा गौरव; राज्यपालांकडून पाच लाखांचे बक्षीस जाहीर!

25 January 2023, 13:09 IST Harshada Bhirvandekar
25 January 2023, 13:09 IST
  • Madhurav: मराठी भाषेच्या जन्मापासून आजपर्यंत भाषेचा झालेला प्रवास, त्यातल्या गमतीजमती-तथ्य यांची गप्पागोष्टी, गायन, नृत्य, नाट्य, अभिवाचन यातून होणारी दर्जेदार सुरेख गुंफण असलेला कार्यक्रम म्हणजे ‘मधुरव-बोरू ते ब्लॉग’. मराठी भाषेच्या जन्माची २००० वर्षांची संगीतमय कहाणी सांगणाऱ्या या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण नुकतेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे संपन्न झाले. 'मधुरव- बोरू ते ब्लॉग' ही मराठी भाषेप्रती सार्थ अभिमान जागविणारी नाट्यकृती असून नाट्याचे प्रयोग सर्वत्र आणि विशेषतः महाविद्यालयांमध्ये अधिकाधिक झाले पाहिजे, असे म्हणत राज्यपालांनी या कार्यक्रमाला पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
Readmore