Udayanraje Bhosale on Dolby: सातारा जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून डॉल्बी स्पीकरवर बंदी असल्यानं अनेक डॉल्बी व्यावसायिकांची कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. तरुणाईलाही डॉल्बीचं आकर्षण आहे. या दोन्हीचा विचार करून डॉल्बी सुरू करण्याची मागणी होत असून खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यास पाठिंबा दर्शवला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात साताऱ्यात डॉल्बी सुरू झालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.