Ghatkopar Building Collapse : पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबले व काही ठिकाणी इमारत कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. घाटकोपरमध्ये एका इमारतीचा भाग कोसळला आहे. तिथं सुरू करण्यात आलेलं बचावकार्य थांबवण्यात आलं आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखालून दोघांना बाहेर काढण्यात मदत पथकाला यश आलं. मात्र, त्यांचा जीव वाचू शकलेला नाही. सध्या घटनास्थळी भयानक चित्र आहे.