Asim Sarode on Article 370 : महाविकास आघाडीचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांच्या प्रचारासाठी प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी नुकतंच भाषण केलं. सरोदे यांनी देशातील वास्तव मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा व भाजपवर जोरदार हल्ला चढवला. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केलं असा प्रचार अमित शहा करतात. मात्र, हे कलम केवळ निष्प्रभ करण्यात आलं आहे. ते संविधानात अजूनही तसंच आहे. शिवाय कलम ३७० हे देशप्रेमासाठी वगैरे निष्प्रभ करण्यात आलेलं नाही. तिथं लिथियमचे साठे असल्यामुळं हा निर्णय घेतला गेलेला आहे. हे कलम रद्द झाल्यानंतर गौतम अदानी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये ५७ हजार एकर जमीन खरेदी केली आहे, असा दावाही सरोदे यांनी यावेळी केला.