Ganesh festival on the set of Bhagya Dile tu mala: लाडक्या गणरायाचं आगमन धुमधडाक्यात झालं आहे. गणेशाच्या आगमनामुळं घराघरात उत्साहाचं वातावरण आहे. टीव्ही मालिकांचे सेटही यास अपवाद नाहीत. मालिकेतील कलाकारही बाप्पाच्या भक्तीमध्ये दंग झाले आहेत. 'भाग्य दिले तू मला' या मालिकेच्या सेटवर देखील गणरायाचं जल्लोषात आगमन झालं आहे. या मालिकेत रत्नमालाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी बाप्पासाठी मोदकाचा नैवेद्य बनवला आहे.