मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान (राणीची बाग) येथे ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान वार्षिक झाडे, फुले, फळे व भाज्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. तब्बल ५ हजारांहून अधिक जातीच्या फुलांचे प्रदर्शन येथे भरवण्यात आले आहे. या ठिकाणी गुलाबाच्या १००, शेवंतीच्या ७०, पेटोनियाच्या ५०,एडोनियमच्या १५० जाती पाहायला मिळतात. प्रदर्शनात बोन्साय, मदवृक्ष, अननवर्गीय वनस्पती आणि ट्रेमधील निसर्गरचना पहायला मिळते. मुंबंई महानगरपालिकेद्वारे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.