fire in firecracker stall vijayawada andhra pradesh : आंध्रप्रदेशातील विजयवाड्यात फटाक्यांच्या दुकानांना आग लागल्यानं दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. जेव्हा फटाक्यांच्या स्टॉलला आग लागली तेव्हा स्टॉलवर फटाके खरेदी करण्यासाठी असंख्य लोकांनी गर्दी केलेली होती. त्यामुळं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.