Udyog Nagar Fire Incident : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतून भीषण आगीची घटना समोर आली आहे. शहरातील उद्योगनगर परिसरातील एका बुटाच्या कारखान्यात भीषण आग लागली आहे. आगीच्या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं नाही. परंतु कारखान्यातील कोट्यवधींच्या संपत्तीचं नुकसान झालं आहे. त्यानंतर आता आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. कारखान्यातील कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहे. कारखान्यातून धुराचे लोट बाहेर पडत असल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.