Gujarat Ahmedabad Hospital Fire : गुजरातच्या अहमदाबाद शहरातील राजस्थान रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास रुग्णालयात आग लागली असून त्यात कोणतीही जीवीतहानी झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी १२५ लोकांना रुग्णालयातून बाहेर काढलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आलं असून कूलिंगचं काम हाती घेण्यात आलं आहे. बाहेर काढण्यात आलेल्या रुग्णांना उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं आहे. याशिवाय हॉस्पिटलमधील रुग्णसेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.