Amitabh Bachchan Birthday Celebration: बॉलिवूडचे ‘महानायक’ अमिताभ बच्चन आज (११ ऑक्टोबर) आपला ८१वा वाढदिवस साजरा करत आहे. अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शेकडो चाहते त्यांच्या घराबाहेर म्हणजेच जलसा बंगल्याबाहेर जमले होते. चाहत्यांचं प्रेम पाहून रात्री स्वतः अमिताभ बच्चन बाहेर आले आणि त्यांनी चाहत्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि सगळ्यांचे आभार मानले. अमिताभ बच्चन पुन्हा एकदा ट्रेंडी फॅशन लूकमध्ये दिसले.