Tripti Dimri: अभिनेता रणबीर कपूरचा 'अॅनिमल' हा चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाचा झेंडा रोवला आहे. 'अॅनिमल' हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता ३७ दिवस उलटून गेले आहेत. परंतु, अजूनही या चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. 'अॅनिमल' हा चित्रपट २०२३चा मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाला भरपूर यश मिळाले आहे. या चित्रपटाला मिळालेल्या यशाच्या निमित्ताने एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत चित्रपटातील कलाकार आपल्या कुटुंबासोबत सामील झाले होते. यावेळी चित्रपटातील अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने देखील हजेरी लावली होती. तिला मंचावर पाहताच सगळ्यांनी ‘भाभी २’ असे म्हणण्यास सुरुवात केली.