Bigg Boss ott 2 Winner: १७ जूनपासून सुरू झालेल्या 'बिग बॉस ओटीटी २' या रिअॅलिटी शोचा विजेता काल घोषित करण्यात आला. 'राव साहब' म्हणजेच एल्विश यादव याने विजेतेपदावर स्वत:चे नाव कोरले. विजेतेपद मिळवल्यानंतर एल्विश यादवला 'बिग बॉस ओटीटी २' ची ट्रॉफी त्याचबरोबर २५ लाख रुपये रोख रक्कम बक्षीस स्वरूपात मिळाली. एल्विश यादवने 'बिग बॉस ओटीटी २' चे विजेतेपद मिळवून इतिहास रचला आहे. बिग बॉसच्या गेल्या १६ ते १७ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच झाले आहे की, वाइल्डकार्ड स्पर्धकाने शो जिंकला आहे.