Fire Incident In Punalur Madurai Express : तामिळनाडूत भल्या पहाटे एका धावत्या रेल्वेत भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुनलपूर-मदुराई रेल्वेत गॅस फुटल्याने आग लागली असून त्यात संपूर्ण डबा जळून खाक झाला आहे. या घटनेत रेल्वेतील आठ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. तर २० प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. त्यानंतर आता स्थानिक पोलीस, रेल्वे अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. तसेच जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.