Ed Sheeran In Mumbai: 'शेप ऑफ यू' या प्रसिद्ध गाण्याचा गायक ईडी शीरन भारतात आला आहे. एका कॉन्सर्टच्या निमित्ताने तो भारतात आलेल्या Ed Sheeranने मुंबईतील एका शाळेत जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांसोबत धमाल केली आणि त्याची लोकप्रिय गाणी देखील गायली. याचा व्हिडीओ त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो मुंबईतील एका शाळेत विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना दिसला आहे. यावेळी गायक Ed Sheeranने गिटार वाजवून मुलांसोबत त्याचे प्रसिद्ध गाणे 'शेप ऑफ यू' देखील गायले.