अंडाशयांची अंडी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी त्यांचे पुनरुज्जीवन करणे याला “ओव्हेरियन रिजुवेनेशन” म्हणतात. अलीकडे पीआरपी म्हणजेच प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरेपीला चांगलीच पसंती मिळत आहे. या थेरपीमध्ये रुग्णाच्या स्वतःच्या रक्ताचा उपयोग केला जातो. ज्या महिलांमध्ये स्त्रीबीजाचा साठा कमी असेल त्यांच्याकरिता अशा थेरेपीची निवड केली जाते. ज्यांना स्त्रीबीजाकरिता डोनर नको असतो अशा महिलांकरिता हे एक वरदान ठरते. यामुळे त्या महिलेला मातृत्वाचा अनुभव घेता येतो.