महाराष्ट्रात सणांच्या पार्श्वभूमीवर अनेक उपक्रम राबविले जातात ,असाच उपक्रम गिरगाव प्रबोधन दिवाळी निमित्त घेऊन येत आहे .दि.५ व ६ नोव्हेंबर २०२२ रोजी गिरगांवात किल्ले बांधणी स्पर्धा व प्रदर्शन याचे आयोजन केले आहे.यंदा या उपक्रमाचे हे सहावे वर्ष आहे .ही स्पर्धा सर्व वयोगटा करीत खुली आहे व त्यातील काही निवडक किल्ले प्रदर्शनाकरिता ठेवण्यात येणार आहेत. स्वराज्याची राजधानी असणारा ८ फुटांचा रायगड साकारण्यात येणार आहे.या सोबत विजयदुर्ग, नळदुर्ग,प्रतापगड व इतर गडकिल्याची प्रतिकृती पाहण्यास मिळतील .