Dunki Movie: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा 'डंकी' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा राजकुमार हिराणी यांच्या हाती होती. राजकुमार हिराणी आणि शाहरुख खान ही जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आली आहे. दरम्यान या चित्रपटाच्या यशानंतर राजकुमार हिराणी यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी शाहरुख खानचं तोंडभरून कौतुक केलं आहे.