dhananjay munde video : बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक यावेळी अत्यंत चुरशीची झाली. या चुरशीच्या लढतीत भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला, तर महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली. मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यात काही अनुचित प्रकार घडल्याच्या बातम्या होत्या. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पोलीस महासंचालकांना या परिस्थितीत लक्ष घालण्याचं आवाहनही केलं होतं. त्यानंतरही महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला शांततेचं आवाहन केलं आहे.