भारतीय जनता पक्षाच्या पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी व पुढील रणनीती ठरवण्यासाठी मुंबईत आज भाजपच्या आमदारांची बैठक झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीला मार्गदर्शन केलं. भाजप कुठे कमी पडला हे सांगताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर त्यांनी निशाणा साधला. ठाकरेंच्या शिवसेनेला मराठी माणसांनी मतं दिलेली नाहीत. त्यांना एका विशिष्ट समाजानं मतं दिली आहेत. त्यांचा पक्ष ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदु्र्ग आणि पालघरमधून जवळपास हद्दपार झाला आहे, असा दावा फडणवीस यांनी केला.