Video : कर्नाटकच्या पराभवाचं विश्लेषण करताना फडणवीसांनी मांडलं टक्केवारीचं गणित
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : कर्नाटकच्या पराभवाचं विश्लेषण करताना फडणवीसांनी मांडलं टक्केवारीचं गणित

Video : कर्नाटकच्या पराभवाचं विश्लेषण करताना फडणवीसांनी मांडलं टक्केवारीचं गणित

Published May 13, 2023 05:34 PM IST

Devendra Fadnavis on Karnataka Results : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. त्यावर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाचं विश्लेषण करताना मतांची टक्केवारी सांगितली. आमचा मतटक्का कायम आहे. जेडीएसची मतं काँग्रेसला मिळाल्यानं त्यांचा विजय झाला आहे, असं फडणवीस म्हणाले. भाजपवर टीका करणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवरही त्यांनी टीका केली. ज्यांचा कर्नाटकच्या निवडणुकीशी काडीचा संबंध नाही, ते देश जिंकल्यासारखे प्रतिक्रिया देत आहे. पण कर्नाटकच्या निवडणुकीचा देशाच्या किंवा अन्य कुठल्याही निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही, असं फडणवीस म्हणाले.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp