Aishwarya Rai Bachchan At Cannes: केवळ तिच्या सौंदर्यासाठीच नव्हे तर फॅशन आणि स्टाईल स्टेटमेंटसाठीही जगभरात प्रसिद्ध असलेली ऐश्वर्या राय बच्चन कान्सच्या दुसऱ्या दिवशीही मनमोहक लुक्ससह रेड कार्पेटवर चालताना दिसली. तिने दुसऱ्या दिवशीचा लूक खूप वेगळा ठेवला होता. तिने आईस ब्लू आणि सिल्व्हर कलरचा अतिशय अनोखा गाऊन परिधान केलेला दिसत होता. चमकदार गाऊनमध्ये तिने बरीच लाइमलाइट चोरली. या लूकमुळे तिची सर्वत्र चर्चा होत आहे.