Ajit Pawar : पुण्यात आज गणेशोत्सवाची सांगता होणार असून श्रीमंत दगडू शेठ गणरायाची मूर्ती मुख्य मंदिरात नेण्यात आली. दरम्यान, आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी व खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह श्रीमंत दगडू शेठ गणपती मंदिरात अभिषेक केला. यानंतर त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली.