Delhi Water Shortage : राजधानी दिल्लीला सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं पाणी दिसलं की लोकांच्या झुंडीच्या झुंडी तिकडं धावत आहेत. गोविंदपुरी भागात पाण्याचा टँकर जेव्हा पोहोचला, तेव्हा लोक थेट टँकरवर चढले. महिलाही यात मागे नव्हत्या.