मराठी बातम्या  /  Video Gallery  /  Delhi Chief Minister Arvind Kejriwal Launched A No-holds-barred Attack On Prime Minister Narendra Modi

Video: केजरीवाल म्हणाले, ‘बंदुकीच्या धाकावर नारायण राणे भाजपत गेले…’

Mar 29, 2023 07:52 PM IST Haaris Rahim Shaikh
Mar 29, 2023 07:52 PM IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज भाजपवर घणाघाती टीका केली. ईडी आणि सीबीआय या तपास यंत्रणांनी सर्व भ्रष्टाचाऱ्यांना एका पक्षात एकत्र केले असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. केंद्रीय तपास यंत्रणा धाड टाकतात आणि डोक्यावर बंदूक लावून विचारतात, ‘तुम्हाला जेलमध्ये जायचे आहे की भाजपमध्ये?’ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घोटाळा केला होता. त्यांच्याही डोक्यावर तपास यंत्रणांनी बंदूक ठेवली होती म्हणूनच ते भाजपत गेले, असा आरोप केजरीवाल यांनी केला.

More