Anupam Kher : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे २६ डिसेंबर रोजी वयाच्या ९२व्या वर्षी एम्स, नवी दिल्ली येथे निधन झाले. भारताचे ज्येष्ठ काँग्रेस नेते, अर्थशास्त्रज्ञ मनमोहन सिंग यांनी २००४ ते २०१४ पर्यंत पंतप्रधान म्हणून काम केले आणि देशाच्या इतिहासावर अमिट छाप सोडली. माजी पंतप्रधानांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी 'अॅक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर' या चित्रपटात डॉ. मनमोहन सिंग यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटादरम्यान त्यांना अनुभवायला मिळालेले डॉ. मनमोहन सिंग कसे होते, याच्या आठवणी त्यांनी शेअर केल्या आहेत.