Congress workers purify Vidhan Soudha: विधानसभेत कॉंग्रेसच्या दणदणीत विजयानंतर आज आमदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी विधानसभा परिसरात गोमूत्र आणि गंगाजल शिंपडून पवित्र करण्यात आला. यावेळी हनुमान चालिसाचे पठण, हवन आणि पूजा करण्यात आली. भाजपने भ्रष्टाचार करून विधानसभा अपवित्र केल्याचा आरोप कॉंग्रेसने केला होता.