कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या लोकसभा सचिवालयाच्या निर्णयावर कॉंग्रेस पक्षाकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राहुल गांधी संसदेत सत्य बोलले म्हणून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली असल्याचा आरोप कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे यांनी केला आहे.