Rahul Gandhi In Bharat Jodo Yatra : उत्तर भारतात थंडीची लाट आलेली असतानाही भारत जोडो यात्रेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे स्वेटर न घालता केवळ टी-शर्ट घालून पदयात्रा करत आहेत. त्यामुळं राहुल गांधींना थंडी लागत नाही का?, असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. त्यामुळं आता टी-शर्ट घालण्याचं कारण काय?, याबाबतचा खुलासा खुद्द राहुल गांधींनी केला आहे.