Eknath Shinde LIVE : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीच्या खेडमधील गोळीबार मैदानात जाहीर सभा घेत उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. सत्तेसाठी ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांना बाजूला सारण्याचं आलं. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली. शिवसेनेवरील तोच डाग आम्ही पुसण्याचा प्रयत्न केल्याचं सांगत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरे गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.