Eknath Shinde Speech : बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन १९ जून २०२४ रोजी पार पडला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं मुंबईतील वरळी येथील एका सभागृहात हा सोहळा साजरा केला. एकनाथ शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. खरी शिवसेना आपलीच आहे. आपण घासून पुसून नाही, ठासून विजय मिळवलाय. शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्याचा खरा अधिकार आपल्यालाच आहे, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.