Kolhapur Violence : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी सोशल मीडियावर वादग्रस्त स्टेटस शेयर करण्यात आल्यानंतर कोल्हापुरात दोन गटात तुफान राडा झाला आहे. वादग्रस्त पोस्टचा निषेध करण्यासाठी आणि दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारला आहे. यावेळी कोल्हापुरातील मुख्य चौकात जमावाने गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्यात आलं आहे. पोलिसांनी कोल्हापुरात पुढील १८ मे पर्यंत जमावबंदी लागू केली असून शहरातील अनेक ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.