Danve vs Bhumre : औरंगाबादमध्ये जोरदार राडा, निधी वाटपावरून दानवे-भुमरेंमध्ये वादावादी
- Ambadas Danve vs Sandipan Bhumre : औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मंत्री संदीपान भुमरे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी मिळत नसल्याची तक्रार ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. त्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार- संदीपान भुमरे आणि अंबादास दानवे यांच्यात जोरदार वादावादी झाली आहे. बैठकीतील राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.