Irshalwadi Landslide in Raigad district- रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात उंच डोंगरावर वसलेल्या इर्शाळवाडी या छोट्याशा आदिवासी गावावर काल, बुधवारी रात्री डोंगरकडा कोसळल्याने अनेक जण गाडले गेले. सततच्या पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत असून आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असल्याचं प्रशासनाने सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इर्शाळवाडी येथे जाऊन घटनास्थळी भेट दिली