Video: संभाजीनगरमधील घटना हा देवेंद्र फडणवीस यांचाच प्लॅन- चंद्रकांत खैरे; फडणवीसांचे प्रत्युत्तर
संभाजीनगर येथे झालेल्या राड्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रतिक्रिया व्यक्त केली. संभाजीनगर शहरामध्ये झालेल्या राड्यानंतर तेथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे फडणवीस म्हणाले. काही नेते भडकावू वक्तव्य देऊन परिस्थिती चिघळविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. दरम्यान, संभाजीनगर शहराचे माजी खासदार, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीस हे शहरात झालेल्या राड्यामागचे मास्टरमाइंड असल्याचा खळबळजनक आरोप केला होता.