१५०० किलो वजनाची १० बाय १० फुटाची भक्कम कढई, प्रत्येकी १०० किलोहून जास्त साहित्याचा वापर, साहित्याचे २३ प्रकारचे साहित्य, १०० विद्यार्थी आणि स्वतः शेफ विष्णू मनोहर आणि टीमची सलग तीन- साडेतीन तासांच्या मेहनतीचा परिपाक म्हणजे ६ हजार ५०० किलो मिक्स व्हेजिटेबल खिचडी.