Vijay Raghavendra: साऊथ चित्रपटांचा प्रसिद्ध अभिनेता विजय राघवेंद्र याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेता विजय राघवेंद्र याची पत्नी स्पंदना राघवेंद्र हिचे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. बँकॉक येथील रुग्णालयात स्पंदनाने अखेरचा श्वास घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार विजय राघवेंद्र याची पत्नी संपूर्ण कुटुंबासह थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत होती. मात्र, या दरम्यानच तिच्यावर काळाने घाला घातला. तिला अखेरचा निरोप देताना तो खूपच कोसळून गेला होता.