Car Accident On Z Bridge Pune : पुण्यातील अत्यंत गर्दीचा भाग समजल्या जाणाऱ्या झेडब्रीजवर भरधाव कारने तीन लोकांना उडवल्याची घटना समोर आली आहे. मद्यप्राशन केलेल्या ड्रायव्हरचं कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी चालकाला ताब्यात घेतलं. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.