Elvish Yadav: १४ ऑगस्टच्या रात्री बिग बॉस ओटीटी २चा फिनाले पार पडला व यात 'राव साहब' म्हणजेच एल्विश यादव याने बाजी मारली. विजेतेपद मिळवल्यानंतर एल्विश यादवला 'बिग बॉस ओटीटी २' ची ट्रॉफी त्याचबरोबर २५ लाख रुपये रोख रक्कम बक्षीस स्वरूपात मिळाली. एल्विश यादवने 'बिग बॉस ओटीटी २' चे विजेतेपद मिळवून इतिहास रचला आहे. ‘बिग बॉस ओटीटी २’च्या फायनल आधी एल्विशच्या चाहत्यांनी चांगलाच कल्ला केला होता. यावेळी त्यांनी एल्विशला वोट्स देताना चक्क संपूर्ण सिस्टमच हँग केली.