Bhatghar Dam : पुणे जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. धरण ९९.११ टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाच्या अस्वयंचलित द्वारांमधून सांडव्याद्वारे १९ हजार क्युसेक विसर्ग नदी पात्रामध्ये सोडण्यात येत आहे.