जगभरात १ ते ७ ऑगस्ट हा आठवडा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. स्तनपानाचं महत्व, फायदे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या दरम्यान विविध उपक्रम राबविण्यात येतात. प्रसुतीनंतर किमान पहिल्या एका तासात स्तनपान नक्की द्यावे. प्रसूतीनंतर सुरुवातीच्या काळात आईच्या स्तनामधून चिक येतो हा चीक बाळासाठी अमूल्य असतो. चिकामध्ये ए आणि के हे जीवनसत्व जास्त प्रमाणात असतात. त्यांमध्ये प्रतिबंधक द्रव्य व इतर आवश्यक घटक असल्यामुळे जंतु संसर्गापासून बाळाचे रक्षण होते. स्तनपानामुळे आई व बाळा मधील नाते अधिक दृढ होते. बाळामध्ये सुरक्षिततेची भावना वाढते. स्तनपानामुळे बाळाचे स्नायू नीट तयार होतात आणि त्यांचा विकास होतो.