Call Me Bea series: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची हिची वेब सीरिज 'कॉल मी बे’ उद्यापासून म्हणजेच ६ सप्टेंबरपासून प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी सीरिजचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. 'कॉल मी बे'च्या या खास स्क्रिनिंगला अवघं बॉलिवूड हजर होतं. सुहाना खान, सारा अली खानपासून ते कार्तिक आर्यन आणि तमन्ना भाटिया ही वेब सीरिज पाहण्यासाठी आणि अनन्या पांडेला प्रोत्साहन देण्यासाठी आले होते.