Akshay Kumar casts his vote: बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार याने या वर्षी पहिल्यांदाच मतदान केलं आहे. देशाविषयी अतिशय जागरूक असणारा हा अभिनेता आजवर त्याच्या कॅनडियन नागरिकत्वामुळे मतदान करू शकलेला नव्हता, मात्र, यावर्षी अक्षय कुमार याने भारताचे नागरिकत्व स्वीकारले आहे. त्यामुळे भारताचे नागरिकत्व स्वीकारल्यानंतर अक्षय कुमार पहिल्यांदाच मतदान करताना दिसला आहे. यावेळी त्याने चाहत्यांना देखील विचारपूर्वक मत देण्याचे आवाहन केले आहे.