JP Nadda In Aurangabad : भाजपच्या मिशन लोकसभा २०२४ अंतर्गत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांची मराठवाड्यातील औरंगाबादेत पहिल्यांदाच जाहीर सभा झाली. परंतु त्यांच्या भाषणापेक्षा सभेत जमलेल्या लोकांचीच फार चर्चा होत आहे. कारण नड्डांच्या सभेवेळी मैदानात शेकडो खुर्च्या मोकळ्या होत्या. मोजकीच गर्दी जमल्यामुळं नड्डांच्या सभेत खड्डा पडल्याचं सांगत शिवसेनेनं भाजपची खिल्ली उडवली आहे. औरंगाबादमधून भाजपचे दोन केंद्रीय मंत्री आणि राज्यात एक मंत्री असतानाही गर्दी जमवता न आल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.