Bigg Boss OTT 2 Jade Hadid: 'बिग बॉस ओटीटी २' हा शो आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या सीझनचा शेवटचा आठवडा आता सुरू झाला आहे. पण फिनाले आठवड्यापूर्वीच घरातील दोन खास स्पर्धकांना बाहेर काढण्यात आले आहे, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. वीकेंड का वार एपिसोडमध्ये, सलमान खानने अविनाश सचदेव आणि जेड हदीद यांना बेघर केले. या घरातून बाहेर आल्यावर आता लेबनानमधील मॉडेल जेड हदीद याने आपला अनुभव सांगितला आहे. यावेळी त्याने आता भारतातही आपल्याला हक्काची माणसं मिळाली असं म्हटलं आहे.