Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: सध्या सर्वत्र 'बिग बॉस मराठी ५'च्या विजेत्याची हवा सुरू झाली आहे. यंदाच्या 'बिग बॉस'च्या ट्रॉफीवर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सूरज चव्हाणने नाव कोरले आहे. 'बिग बॉस मराठी सीझन ५’ या पर्वाचे विजेतेपद मिळवल्यानंतर सूरजचं भरभरुन कौतुक करण्यात आलं. आता त्याचा पहिला चित्रपट रिलीज होणार आहे. नुकताच सूरज 'बिग बॉस'च्या ट्रॉफीसह त्याच्या मोडवे गावातील आई मरिमातेच्या चरणी नतमस्तक झाल. यावेळी त्याने त्याच्या आगामी 'राजा राणी' चित्रपटाचा ट्रेलर स्वतःच्या हाताने लाँच केला. सूरजच्या ‘राजा राणी’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात ‘बिग बॉस मराठी’ फेम वैभव चव्हाणनेसुद्धा उपस्थिती लावली होती.