Nikki Tamoli Mother: ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात सध्या बराच हंगामा पाहायला मिळत आहे. नुकतीच या घरात हाणामारी पाहायला मिळाली. आर्याने निक्की तांबोळीच्या कानाखाली आवाज काढला. यानंतर आता निक्कीच्या आईने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत निक्कीबरोबरच्या वर्तणुकीवर भाष्य केलं असून, यात त्यांनी निक्कीला संरक्षण देण्याबरोबरच आर्याला घराबाहेर काढण्याची मागणी केली आहे. निक्कीची आई यावेळी संग्राम आणि आर्यावर चांगलीच संतापलेली दिसली.