Jahnavi Killekar: ‘बिग बॉस मराठी ५’ या लोकप्रिय शोने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. नुकताच या शोचा ग्रँड फिनाले पार पडला. यावेळी टॉप ६मध्ये असलेल्या स्पर्धक जान्हवी किल्लेकर हिने ९ लाख रुपये घेऊन हा खेळ सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा तिचा निर्णय अतिशय योग्य ठरला. शो संपल्यानंतर तब्बल ७० दिवसांनी जान्हवी घरी परतली. यावेळी तिच्या कुटुंबातील लोकांनी ढोल ताश्यांच्या गजरात जान्हवीचे स्वागत केले. तर, जान्हवीने देखील सगळ्यांसोबत ठेका धरला होता.