Bigg Boss Marathi 4 Winner: गेले १०० दिवस ‘बिग बॉस मराठी ४’ने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. नुकताच या शोचा महाअंतिम सोहळा पार पडला. प्रेक्षकांचे वोट्स आणि स्पर्धकांच्या खेळीवर हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तब्बल १०० दिवसांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर आता या शोला त्यांचा विजेता मिळाला आहे. अभिनेता अक्षय केळकर याने ‘बिग बॉस मराठी ४’ची ट्रॉफी पटकावली आहे. ‘बिग बॉस मराठी ४’चा विजेता बनून ट्रॉफी हातात घेतल्यानंतर अक्षय केळकर याने पहिले प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.