छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून पाहिल्या जाणाऱ्या 'बिग बॉस १७'चा नुकताच महाअंतिम सोहळा पार पाडला. मनारा चोप्रा, अभिषेक कुमार, मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे व अरुण हे स्पर्धक टॉप ५मध्ये होते. यामध्ये मुनव्वरने सर्वांना टक्कर देत 'बिग बॉस १७'च्या ट्रॉफीवर स्वत:चे नाव कोरले. बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच मुनव्वरने चाहत्यांचे आभार मानले आहेत.